‘ह्या’ मोठ्या बँकेकडून ग्राहकांना अलर्ट; ‘ही’ चूक कराल तर आयुष्यभराची मेहनत पाण्यात घालवाल

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :- सध्याचा जमाना ऑनलाईन झाला आहे. सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. अनेकदा पैशांसंदर्भात देखील सर्व व्यवहार ऑनलाईन होत असतात. परंतु या दरम्यान फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. या फसवणुकीविरोधात अनेकदा बँक अलर्ट जरी करत असतात.

आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीबाबत एक अलर्ट जारी करून फिशिग घोटाळ्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या बँकिंग फ्रॉडपासून सावध करत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना बँकिंग फसवणुकीपासून सावध करण्यासाठी अलर्ट जारी केला आहे.

ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या फसवणुकींचा उल्लेख :- पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या फसवणुकींचा उल्लेख केलाय. यासह सावधगिरी बाळगण्याचे एक ट्विटही केलेय. बँकेने आपल्या ग्राहकांना सोशल मीडियावर बनावट प्रोफाईलपासून सावध राहण्यास सांगितले. हँडलची पडताळणी केल्याशिवाय कोणतेही बाहेरचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका किंवा आपली वैयक्तिक माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.

Advertisement

बँकेने बनावट कॉलपासून ग्राहकांना केले सतर्क :- यापूर्वीही बँकेने बनावट कॉलपासून ग्राहकांना सतर्क केले होते. खरे तर काही लोक बँक कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कॉल करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. फोनवरून बँक खात्याविषयी भीती दाखवून त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत पीएनबीने बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही जाळ्यात अडकू नये, असा इशारा दिला आहे.

असा करा फ्रॉडपासून स्वत:चा बचाव

  • OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करू नका
  • फोनमध्ये कधीही बँकींग संदर्भातील माहिती सेव्ह करू नका
  • एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती शेअर करू नका
  • बँक कधीही कुठलीही माहिती मागत नाही
  • ऑनलाइन पेमेंट करताना सावधगिरी बाळगा
  • तपासणी केल्याशिवाय सॉफ्टवेअर इंस्टॉल करू नका
  • अनोळखी लिंक तपासून घ्या
  • स्पायवेअरपासून सावध राहा

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker