MHLive24 टीम, 24 मार्च 2022 :- Alert for Bank Customers : साधारणपणे ऑनलाईन पेमेंट पद्धत आल्यानंतर अनेकजण QR Code द्वारे डिजिटल पेमेंट करतात. परंतू हे करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकजण QR कोड वापरून डिजिटल पेमेंट करतात. बहुतेक लोक केवळ QR कोडद्वारेच पैशांचे व्यवहार करणे योग्य मानतात. ही प्रक्रिया झटपट होते हे त्याचे मुख्य कारण!
आजकाल ऑनलाइन बँकिंग, यूपीआय पेमेंट, क्यूआर कोडद्वारे पेमेंट खूप ट्रेंडमध्ये आहे. आता छोट्या दुकानांमध्येही तुम्ही QR कोड स्कॅनर लावलेले पाहू शकता. येथे जनतेचे बँकेशी निगडीत काम सोपे होते पण या ऑनलाईनमुळे फसवणुकीलाही प्रोत्साहन मिळत आहे.
QR कोड फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेता, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क केले आहे. बँकेने म्हटले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून QR कोड मिळाला तर तो चुकूनही स्कॅन करू नका कारण ते तुम्हाला गरीब बनवू शकते.
ट्विट करून माहिती दिली
SBI ने ट्विट केले की ‘QR कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा? हा फसवा संदेश असू शकतो आणि अशा QR कोड घोटाळ्यांपासून सावध रहा. असा QR कोड स्कॅन करू नका अन्यथा तुमचा खिसा म्हणजेच बँक खाते रिकामे होऊ शकते. स्कॅन करण्यापूर्वी विचार करा, अज्ञात आणि असत्यापित QR कोड स्कॅन करू नका. सावध राहा नाहीतर थोडासा निष्काळजीपणा तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.
- 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
- 🤷🏻♀️ Mhlive24 आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit