Alcohol Price Update
Alcohol Price Update

MHLive24 टीम, 15 मार्च 2022 :- Alcohol Price Update : आज आपण एक अनोखी बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी तळीरामांसाठी महत्वपूर्ण आहे. होय तळीरामांसाठी ही एक खुशखबर आहे. मध्य प्रदेश या राज्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

होय.जर तुम्ही मध्य प्रदेश राज्यातील आहात आणि दारूचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांनी दारूवरील उत्पादन शुल्कात 10 टक्के कपात केली आहे, या निर्णयानंतर राज्यातील दारूच्या किमती कमी होतील. दारूची किंमत प्रति बाटली 50 ते 500 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

या निर्णयानंतर विदेशी मद्याचे दर 50 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत कमी होतील. व्हिस्की, बिअर, वाईन या सर्वांच्या किमती कमी होतील. याशिवाय देशी दारूही स्वस्त होणार आहे. देशी दारूचा 110 रुपयांना मिळणारा पाव 85 रुपयांना मिळणार आहे.

एका रिपोर्टनुसार, शिवराज सिंह चौहान यांनी दारूवरील मार्जिन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मद्य धोरण सरकार 1 एप्रिलपासून लागू करणार आहे. शुक्रवारी शिवराज मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यात हेरिटेज दारू बनविण्यास मान्यता देण्यात आली.

यानंतर शिवराज म्हणाले, या निर्णयामुळे आदिवासींची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ते महू येथून दारू बनवून विक्री करू शकतील.पायलट प्रोजेक्टअंतर्गत दिंडोरी आणि अलीराजपूरमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

खाजगी बार घ्यायचा असेल तर फक्त 50 हजार लागतात

नवीन दारू धोरणानुसार राज्यातील एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर तो खासगी परवाना घेऊ शकतो. यासोबतच सरकारने घरात दारू ठेवण्याची मर्यादाही 4 पट वाढवली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup