Inspirational : प्रेरणादायी ! एलन मस्क ते रतन टाटा पर्यंत…जाणून घ्या ‘ह्या’ सर्व अब्जाधीशांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कशी केली होती…

MHLive24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- आपण दररोज अब्जाधीशांच्या यशस्वी करिअरबद्दल वाचत आणि ऐकत असतो. पण तुम्हाला या सक्सेस हिरोंच्या सुरुवातीच्या टप्प्यांबद्दल माहिती आहे का? यापैकी काही अब्जाधीश सुरवातीच्या काळात बर्गर बनवायचे तर काही व्हिडिओ गेम विकायचे.(Inspirational)

चला जाणून घेऊया या अब्जाधीशांच्या करिअरच्या पहिल्या टप्प्याबद्दल. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी आणि कुठून केली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रतन टाटा

Advertisement

दान करण्यात प्रसिद्ध असलेले रतन टाटा हे सुरवातीला स्टील कंपनीत सुपरवायझर होते. रतन टाटा यांना पहिल्या कंपनीत जेव्हा नोकरीची ऑफर आली तेव्हा रतन टाटा यांच्याकडे त्यांचा बायोडेटाही नव्हता. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे दयाळू स्वभावासाठी ओळखले जातात.

बिल गेट्स

लहानपणापासूनच कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगकडे कल असलेले बिल गेट्स कोडिंग करायचे. संपत्तीचा समानार्थी शब्द बनलेले बिल गेट्स आज लाखो लोकांच्या जीवनाचे प्रेरणास्थान आहेत. बिल गेट्स यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी २०,००० डॉलर्स कमावले, ही त्यांची पहिली कमाई होती.

Advertisement

स्टीव्ह जॉब्स

कॉलेजमधून काढून टाकलेले स्टीव्ह जॉब्स त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला असेंब्ली लाइन कामगार होते. स्टीव्ह व्हिडिओ गेम्स बनवायचा. स्टीव्ह जरी या जगात राहिले नसले तरी आपल्या नवनवीन शोधांनी तो पुढील अनेक दशके लाखो हृदयांवर राज्य करत राहील.

मार्क झुकरबर्ग

Advertisement

साधा म्युझिक प्लेअर बनवणारी व्यक्ती आज फेसबुकची सीईओ आहे. व्यवसायाने अभियंता असलेल्या मार्क झुकेरबर्गने त्याच्या शाळेत असताना एक म्युझिक प्लेअर तयार केला, ज्याला Synapse Media Player असे नाव देण्यात आले होते.

जेफ बेझोस

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे मालक आणि आज जगात एक नम्बर श्रीमंत असणारे जेफ बेझोस यांनी आपल्या करिअरची सुरुवात बर्गर बनवून केली. बेझोस यांनी मॅकडोनाल्डमध्ये स्वयंपाकी म्हणून देखील काम केले आहे.

Advertisement

एलन मस्क

एलोन मस्क हे व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आहेत. टेस्लाचे सीईओ त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला व्हिडिओ गेम विकायचे. एकेकाळी हे टेस्लाचे मालक नोकरी करण्यात धन्यता मानत होते .
एलोन मस्क हे कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे एका व्हिडिओ गेम कंपनीत काम करत असे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker