Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

एका चित्रपटासाठी अक्षय कुमार घेतो ‘इतके’ कोटी,वाचून बसेल तुम्हालाही धक्का !

Mhlive24 टीम, 13 डिसेंबर 2020 : अभिनेता अक्षय कुमार लवकरच एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येतोय. या चित्रपटाचं नाव आहे बच्चन पांडे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Advertisement

या पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजून एक चकीत करणारी गोष्ट म्हणजे अक्षय कुमारने या चित्रपटासाठी तब्बल ९९ कोटी मानधन म्हणून घेतलय.

Advertisement

सर्वसाधारणपणे अक्षय एका चित्रपटासाठी ११० ते १२५ कोटी रुपयांचं मानधन घेतो. पण चित्रपटाची कथा उत्तम आहे व निर्माता खूप चांगला मित्र असल्यामुळे त्याने केवळ ९९ कोटी रुपयांत होकार दिला आहे.

Advertisement

अक्षय आणि चित्रपटाचे निर्माते साजित नाडियाडवाला यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आपल्या खास मित्रासाठी त्याने कमी मानधनातही चित्रपट करण्यास होकार दिला आहे.

Advertisement

बच्चन पांडे हा एक अक्शन थ्रिलर मूव्ही आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरु आहे. यामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिका साकारणार आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li