‘राज कुंद्रांनी कुठला चित्रपट पाहण्याचा सल्ला द्यावा, तसा अजितदादांचा सल्ला!’

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी संताप व्यक्त केला. त्यावर आमदार नीतेश राणे पवार यांच्यावर जहरी टीका केली. “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे, म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये,” असा सल्ला त्यांनी दिला.

राणेंचा मुख्यमंत्र्यांवर एकेरी वार :- मी चिपळूणमधली सगळी पाहणी करून झाली, तरी एकही अधिकारी मला येऊन भेटला नाही, हे काही बरोबर नाही. हे मी खपवून घेणार नाही, अशी तंबी राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं अधिकाऱ्याने सांगताच, सीएम गेला उडत. मला कुणाची नावं सांगू नका, असा वार राणेंनी केला होता.

अजित पवार यांचं नारायण राणेंना उत्तर :- हे लोक दौरा अधिका-यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले; मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, अशी टीका त्यांनी पवार यांनी केली.

Advertisement

आजोबांचा सल्ला तरी ऐकायचास :- सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार, सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहित पवार यांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत.

त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे, असा प्रश्न सगळ्यांना पडतो. रोहितजींनी थोडं शिकून मगच पावल टाकावीत, असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नीतेश यांनी लगावला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker