एअरटेलचा धांसू प्लॅन ! 1GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग फक्त 5 रुपयांमध्ये

MHLive24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीमुळे लोकांचे जीवन इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मुलांचा ऑनलाईन अभ्यास असो किंवा वर्क फ्रॉम होम. इंटरनेटशिवाय व्यक्ती यापैकी कोणतीही गोष्ट करू शकत नाही.

एअरटेलने ‘हा’ प्लान सादर केला :- लोकांच्या गरजा लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक भारी ऑफर देत आहेत. आता टेलिकॉम कंपनी एअरटेल ने असाच एक नवीन प्लान (एअरटेल न्यू डेटा प्लान) सादर केला आहे. ज्यामध्ये वापरकर्ते दररोज सरासरी फक्त 5 रुपये खर्च करून 1GB डेटा आणि इतर सुविधा मिळवू शकतात.

28 दिवसांची वैधता :- एअरटेल कंपनीचा हा नवीन प्लान 448 रुपयांचा आहे. 28 दिवसांच्या वैधता असलेल्या या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा दिला जात आहे. अशा प्रकारे 28 दिवसात तुम्ही एकूण 84GB डेटा घेऊ शकता. त्यानुसार तुम्हाला दररोज सुमारे 5 रुपयांमध्ये 1GB डेटा मिळत आहे.

Advertisement

कंपनीने या प्लॅनमध्ये आपल्या वापरकर्त्यांना 100 मोफत एसएमएस अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील दिली आहे. या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता.

सोबतच मिळेल ‘हे’ सब्सक्रिप्शन :- विशेष गोष्ट म्हणजे कंपनी या योजनेत डिस्ने + हॉटस्टारचे एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शनही देत आहे. ही सबस्क्रिप्शन स्वतंत्रपणे खरेदी करण्यासाठी 399 रुपये खर्च येतो.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker