BIG News : Jio च्या तक्रारीवरून Airtel आणि Vodafone ला 3000 कोटींचा दंड

MHLive24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- दूरसंचार क्षेत्रामध्ये सध्या एअरटेल, जिओ, vi या तीनच खासगी कंपन्या वर्चस्व गाजवत आहेत. यात जिओ ने आपले वर्चस्व जास्त प्रस्थापित केले आहे. आता दूरसंचार क्षेत्रामधून महत्वाची बातमी आली आहे.(BIG News )

दूरसंचार विभागाने वोडाफोन आयडियावर 2,000 कोटी रुपये आणि भारती एअरटेलवर 1,050 कोटी रुपयांचा दंड नियामक ट्रायच्या पाच वर्ष जुन्या शिफारशीवर आधारित ठोठावलाय.

एका सूत्राने गुरुवारी कंपन्यांना दिलेल्या डिमांड नोटिसशी संबंधित साहित्य शेअर करताना ही माहिती दिली. दूरसंचार संचालकांना दंड भरण्यासाठी दूरसंचार विभागाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

Advertisement

एअरटेलकडून नाराजी

यासंदर्भात भारती एअरटेलकडून सांगण्यात आले आहे की एअरटेल २०१६ च्या पॉईंट ऑफ इंटरकनेक्टच्या तरतूदीशी संबंधित ट्रायच्या शिफारशींच्या आधारावर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात निराश आहे. हे आरोप चुकीचे आहेत.

पुढे एअरटेलने म्हटले आहे की भारती एअरटेलने नियमांचे पालन केले आहे आणि नेहमीच देशाच्या कायद्याचे पालन करत आली आहे. आम्ही या आदेशाला आव्हान देऊ आणि कायदेशीर पर्यायांचा विचार करू. व्होडाफोन आयडियाने अद्याप यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

ट्रायने २०१६ मध्ये केला होता दंड

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायने ऑक्टोबर २०१६ मध्ये रिलायन्स जिओला इंटर कनेक्टिव्हिटी न देण्यासंदर्भात एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया यांच्यावर एकूण ३,०५० कोटी रुपयांचा दंड आकारण्याची सूचना केली होती. ट्रायने त्यावेळेस म्हटले होते की दूरसंचार लायसन्स रद्द करण्याची मात्र सूचना केली नव्हती. कारण यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले असते.

डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशनने दंड मंजूर केला होता

Advertisement

रिलायन्स जिओच्या तक्रारीवर ट्रायची शिफारस आली आहे. जिओने म्हटले होते की, त्याच्या नेटवर्कवर 75 टक्क्यांहून अधिक कॉल येत नाहीत, कारण पुरेसे इंटरफेस (पीओआय) दिले जात नाहीत. दूरसंचार विभागाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशनने जुलै 2019 मध्ये हा दंड मंजूर केला होता.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker