हायस्पीड रेल्वेच्या विरोधात आळेफाट्याला ‘रास्ता रोको!’

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी एक इंचही जमीन देणार नाही, असा कडक इशारा पुणे जिल्हा रेल्वे कृती समीतीचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ यांनी आळेफाटा या ठिकाणी आयोजित केलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात दिला.

पूर्वकल्पना न देता मोजणी :- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर, हवेली या तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या बागायती जमिनीमध्ये जात असून, याला विरोध करण्यासाठी पुणे जिल्हा रेल्वे कृती समितीच्या वतीने आळेफाटा(ता.जुन्नर) या ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, नगदवाडी, भटकळवाडी, आळे, कोळवाडी,संतवाडी या गावातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे जात असून, ‘महारेल’ ने मोजणीची प्रक्रिया कुठलीही माहिती न देता मोजणी सुरू केली आहे. याबाबत शेतक-यांना जमिनीचा मोबदला किती याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही.

Advertisement

जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका :- या रेल्वे ज्या ठिकाणाहून जात आहे, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी जात असून उर्वरित क्षेत्राला पाणीपुरवठा कुठून करायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईन आहेत, याबाबत ‘महारेल’ने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अनेक प्रकल्पांना यापूर्वी आमच्या जमिनींचे संपादन झाले असल्याने रेल्वे प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका या वेळी व्यक्त केली.

शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ :- शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अंबादास हांडे यांनी या वेळी सांगितले, की जुन्नर तालुक्यात पाच धरणे असून धरणांमध्ये तसेच जे कालवे गेले आहेत, त्यामध्ये शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी गेल्या आहेत. त्यातच आता या रेल्वे प्रकल्पात जमिनी जात असल्याने शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

जमिनीसाठी तुरुंगात जाण्याची तयारी :- शासनाने बाजारभावाच्या चारपट मोबदला व पंचवीस टक्के प्रोत्साहनपर भरपाई देणार असल्याचे जाहीर केले, तरी आम्ही आमची जमीन देणार नाही व यासाठी पुणे तुरुंगात जाण्याची तयारी शेतक-यांची आहे, असे खेड पंचायत समीतीचे माजी सभापती पाटील बुवा गवारी यांनी सांगितले.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker