LIC Scheme: निवृत्तीनंतर पैशाचे नो टेन्शन! LIC ने आणली शानदार पॉलिसी आणली, जाणून घ्या डिटेल्स

MHLive24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याविषयी चिंता असते. त्यानुसार तो व्यक्ती आपल्या जीवनात आर्थिक तरतूद करून ठेवत असतो. सरकारी नोकरदार किंवा ज्यांना जास्त पगार आहेत असे लोक तरतूद करू शकतात. पण कमी पगार असणारे किंवा असंघटित काम करणारे आदी लोकांना मात्र हे जमावने अवघड असते.( LIC Scheme)

पण अशा लोकांसाठी ही बातमी उपयुक्त आहे. LIC ने तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही वृद्धापकाळाचा खर्च सहज सांभाळू शकता.

LIC ने एक नवीन आणि शानदार पॉलिसी जीवन शांती पॉलिसी लाँच केली आहे. एकदा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली की तुम्हाला आजीवन ग्यारंटेड पेन्शन मिळेल. याद्वारे तुम्ही तुमचा निवृत्तीनंतरचा खर्च सहज भागवू शकता.

Advertisement

जाणून घ्या काय आहे स्कीम ?

जीवन शांती पॉलिसी एलआयसीच्या जुन्या प्लॅन जीवन अक्षय योजनेसारखीच आहे. तुम्हाला जीवन शांती पॉलिसीस मध्ये दोन पर्याय आहेत. पहिली इमीडिएट एन्युटी आणि दुसरी डेफ्फर्ड एन्युटी. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे.

पहिल्या म्हणजेच इमीडिएट एन्युटी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शनची सुविधा मिळते. दुसऱ्या डिफर्ड अॅन्युइटीच्या पर्यायामध्ये, पॉलिसी घेतल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनी पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे पेन्शन लगेच सुरू करू शकता.

Advertisement

जीवन शांती पॉलिसी फायदा कोण घेऊ शकेल ?

एलआयसीची ही योजना किमान 30 वर्षे आणि जास्तीत जास्त 85 वर्षे वयाची व्यक्ती घेऊ शकते. जीवन शांती योजनेत पेन्शन सुरू झाल्यानंतर 1 वर्षानंतर कर्ज दिले जाऊ शकते आणि पेन्शन सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर ते सरेंडर केले जाऊ शकते.

आपली इच्छा असल्यास आपण हे एन्युटी पेमेंट वार्षिक, 6 महिने, 3 महिने किंवा अगदी दरमहा मिळवू शकता. नवीन जीवन शांती डिफर्ड एन्युटी योजनेत गुंतवणूकीची कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.

Advertisement

कशी असेल पेन्शन

या योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित नाही. तुमची गुंतवणूक, वय आणि स्थगिती कालावधीनुसार तुम्हाला तुमचे पेन्शन मिळेल. गुंतवणूक आणि पेन्शन सुरू होण्याच्या दरम्यानचा कालावधी जितका जास्त असेल किंवा वय जितके जास्त असेल तितके तुम्हाला पेन्शन मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार LIC पेन्शन देते.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker