एनडीआरएफच्या महाराष्ट्राला अतिरिक्त तुकड्या

MHLive24 टीम, 24 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुराच्या समस्येबाबत सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविल्या आहेत, अशी माहिती माजी मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मोदी, शाह यांचे राज्यातील परिस्थितीवर लक्ष :- “कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना मोदी आणि शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारच्याही संपर्कात आहे. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी दतकार्यात आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

मदत कार्यात हेलिकाॅप्टर, एनडीआरएफ :- फडणवीस म्हणाले, “केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची माहिती घेतली. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना 2 लाख रूपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत तातडीने मोदी यांनी जाहीर केली आहे.

Advertisement

चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल होऊन मदतकार्य करीत आहे. एनडीआरएफचे 26 चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-17, दोन सी-130 तसेच एक एमआय-17 हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक 4 चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात 3, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी 2, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी 1 चमू तैनात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रशासनाने तातडीने मदत करावी :- तळिये गावांत मृतदेह बाहेर काढण्याचे काम गावक-यांना करावे लागले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker