बीडीडी चाळीतून सोडतीसाठी जादा घरे उपलब्ध होणार

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बीडीडी चाळीच्या प्रकल्पातून फक्त बीडीडी चाळवासीयांना घर मिळणारच आहे; पण त्याचबरोबर सोडतीसाठीदेखील उपलब्ध होणार आहे. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींतील 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे रहिवासी 160 चौरस फुटांच्या घरातून 500 चौरस फुटांच्या घरात जातील.

काय म्हणाले म्हाडाचे अधिकारी ? :- म्हाडाला विक्रीसाठी 8 हजार 120 घरे उपलब्ध होणार आहेत. ही सर्व घरे केवळ मध्यम आणि उच्च गटासाठीच आहेत. तीन टप्प्यात पुनर्विकास होणार आहे. ट्रान्झिट कॅम्पमध्ये जाण्यास रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे तीन टप्प्यात पुनर्विकास होणार असे म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश मसे यांनी सांगितले. ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळ प्रकल्प पुनर्विकासाचे कामही यासोबतच होणार, असे मसे यांनी नमूद केले.

500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार :- शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे.

Advertisement

येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पात 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका :- वरळी येथे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहे.

रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker