Top 10 billionaire : जगभरातील श्रीमंत व्यक्तींची नावे जाणून घेण्यासाठी व त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली किंवा किती कमी झाली हे जाणून घेण्यास प्रत्येक हौशी माणूस उत्सुक असतो.

आज आम्ही या हौशी माणसांसाठी जगभरातील टॉप टेन बिलिनियरमध्ये दोन भारतीय कसा डंका वाजवत आहेत ते जाणून घेऊ.

अशातच मुकेश अंबानी यांच्याकडून पुन्हा एकदा आशियातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाचा मुकुट हिसकावण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी, जगातील अब्जाधीशांच्या टॉप-10 यादीत, मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकत आशियातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाचा मुकुट परत मिळवला, परंतु काही तासांनंतर, अदानी पुन्हा आशियातील अब्जाधीश नंबर वन बनले.

फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गुरुवारी दुपारपर्यंत मुकेश अंबानींची संपत्ती $3.1 बिलियन झाली होती आणि गौतम अदानींची संपत्ती $1.3 बिलियनने कमी झाली होती.

यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे अदानींच्या संपत्तीतही वाढ होऊ लागली. शेअर बाजार बंद झाल्यावर, मुकेश अंबानींच्या संपत्तीत एकूण $ 3.4 अब्ज इतकी वाढ झाली, तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत $ 2.7 अब्जची वाढ झाली.

फोर्ब्स रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार शुक्रवारी सकाळपर्यंत अदानीची एकूण संपत्ती $102.5 अब्ज होती आणि ती पुन्हा सहाव्या क्रमांकावर आली आहे.

तर, अंबानी $ 101.6 अब्ज संपत्तीसह 7 व्या स्थानावर आहेत. त्याच वेळी, इलॉन मस्क $ 233.7 अब्ज संपत्तीसह प्रथम स्थानावर आहे.

बर्नार्ड अर्नॉल्ट 157.0 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $151.2 अब्ज आहे. बिल गेट्स 129.1 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत.