fortuneindia_2021-12_d200d599-5ef6-4d65-9e1c-75fe708d0006_Adani_1

Share Market : सध्या मार्केटमध्ये अस्थिरता सुरु असली तरीपण काही स्टॉक असे आहेत जे गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देत आहेत. पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे संयम असला पाहिजे.

जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही शेअर मार्केटचे करोडपती देखील बनू शकता. अशातच केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूह भरभराटीला आला आहे.

समूहाकडून बरेच प्रोजेक्ट उपलब्ध झाले आहेत. अशातच अदानी समूहाचे शेअर्सदेखिल भरपूर प्रमाणात उसळी घेत आहेत.

अशातच अदानी ग्रुपचा एक शेअर भरपूर उसळी घेत आहे. गेल्या 5 वर्षांत 28 रुपयांवरून 327.85 रुपयांपर्यंत वाढलेली अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरने या काळात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

आज शेअरने NSE वर 327.85 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. गेल्या एका आठवड्यात अदानी पॉवरने 21.86 टक्के वाढ नोंदवली आहे.

तर एका महिन्यात हा शेअर 25.7 टक्क्यांनी वाढला आहे. जर आपण मागील एका वर्षाबद्दल बोललो तर अदानी पॉवरने 222.26 टक्के मजबूत परतावा दिला आहे.

24 मे 2017 रोजी अदानीच्या एका शेअरचे मूल्य 28 रुपये होते. आज, पाच वर्षांत, तो सुमारे 991 टक्क्यांनी वाढून 327.85 रुपयांवर पोहोचला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये पाच वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते, तर ते एक लाख एक कोटीच्या जवळपास झाला असता.

दुसरीकडे, 3 वर्षांपूर्वी एखाद्याने त्यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्यांचे एक लाख सुमारे 61 लाख झाले असते.