Adani Group :केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूह भरभराटीला आला आहे. समूहाकडून बरेच प्रोजेक्ट उपलब्ध झाले आहेत. अशातच अदानी समूहाचे शेअर्सदेखिल भरपूर प्रमाणात उसळी घेत आहेत.

अशातच अदानी ग्रुपची एक डील महत्वाची ठरत आहे. वास्तविक अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली अदानी समूहाने दोन मोठे डील केले आहेत.

पहिला करार सिमेंट व्यवसायाशी संबंधित आहे, तर दुसरा करार मीडिया क्षेत्राशी संबंधित आहे. अदानी समूहाने होलसिम समूहाचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याची बोली जिंकली आहे, असे वृत्त आहे.

याचा अर्थ आता अदानी समूहाकडे होल्सीम ग्रुपच्या सिमेंट कंपनी – अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी लि.चा व्यवसाय असेल.

हा करार सुमारे $10.5 अब्ज (80,000 कोटी रुपये) मध्ये झाला आहे. Holcim ग्रुप भारतात जवळपास 17 वर्षांपासून व्यवसाय करत आहे.

Holcim ची ओळख भारतात प्रामुख्याने अंबुजा सिमेंट, ACC Ltd द्वारे केली जाते. अंबुजा सिमेंट, ACC लिमिटेड भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे.

अंबुजा सिमेंटची किंमत 70 हजार कोटींहून अधिक आहे. Holcim ची कंपनीमध्ये 63.19% हिस्सेदारी आहे, तर ACC चे मार्केट कॅप 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये स्विस कंपनीचा 54.53% हिस्सा आहे.

मीडिया क्षेत्रात वाढले वर्चस्व : याशिवाय अदानी समूहाने मीडिया क्षेत्रातही मोठ्या कराराची घोषणा केली आहे. खरं तर, AMG मीडिया नेटवर्क्स, अदानी एंटरप्रायझेसचे एक युनिट, क्विंटिलियन बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या डिजिटल बिझनेस न्यूज प्लॅटफॉर्ममधील 49 टक्के हिस्सा खरेदी करेल.

यापूर्वी मार्च 2022 मध्ये, अदानी एंटरप्रायझेसने क्विंटिलियन बिझनेस मीडिया (QBML) मध्ये काही भागभांडवल संपादन करून मीडिया व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

डीलमधील रक्कम उघड करण्यात आलेली नाही परंतु क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या नियामक नोटिसद्वारे कराराची पुष्टी केली आहे.