well-edge-out-chinese-gear-in-3-5-years-gautam-adani

Adani Group Shares  : केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूह भरभराटीला आला आहे. समूहाकडून बरेच प्रोजेक्ट उपलब्ध झाले आहेत. अशातच अदानी समूहाचे शेअर्सदेखिल भरपूर प्रमाणात उसळी घेत आहेत.

आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगत आहोत त्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. हा स्टॉक अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा आहे.

अदानी समूहाचा हा शेअर 1,847 रुपये प्रति शेअर झाला आहे. त्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या 4 वर्षात 6,171.65% चा रिटर्न 4 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे.

गेल्या चार वर्षांत अदानी ग्रीनचे शेअर्स 29.45 रुपयांवरून रु.1847 वर पोहोचले आहेत. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6,171.65% परतावा दिला आहे.

म्हणजेच चार वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला आज 62.71 लाख रुपयांचा नफा झाला असेल.

एका वर्षात 46.03% परतावा अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात 46.03% परतावा दिला आहे. यादरम्यान, शेअर 1264 रुपयांवरून 1,847 रुपयांवर पोहोचला.

त्याच वेळी, या वर्षी YTD मध्ये स्टॉक 37.13% वर गेला आहे. तथापि, गेल्या एका महिन्यापासून ते विक्रीच्या टप्प्यातून जात आहे आणि आतापर्यंत ते -35.10% खाली आले आहे.