ठेकेदारावर कारवाई, अधिकारी पाठीशी

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- काम कमी करून जादा रकमेची बिले लाटल्याप्रकरणी ती ठेकेदारांनवा काळ्या यादीत टाकण्यात आले असले, तरी दोषी अधिका-याला मात्र पाठीशी घालण्यात आल्याचा प्रकार महापालिकेत घडला.

या तीन ठेकेदारांवर कारवाई :- भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून अखेर तीन ठेकेदार कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मे. रेणुका एंटरप्रायझेस, मे. गणेश प्रोपरायटर आणि मे. सद्गुरू एंटरप्रायझेस अशी या तीन ठेकेदार कंपन्यांची नावे आहेत.

एकीकडे ठेकेदारांवर कारवाई करताना दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासनाने यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भवानी पेठ येथील कार्यालयांतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल झाली होती.

Advertisement

धक्कादायक प्रकार उघडकीस :- त्या तक्रारीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने तपासणी केली असताना अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. त्यात जागेवर काम कमी केले असतानाही संबंधित ठेकेदारांना जादा बिल अदा करणे, एकच कामासाठी दोनदा निधी खर्च करणे असे अनेक प्रकार तपासणीत आढळून आले होते. अखेर प्रशासनाने या प्रकरणी तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले.

दोन फायली गायब ? :- एकूण सहा कामांत अनियमितता आढळून आली आहे; मात्र चौकशीमध्ये त्यापैकी चार कामांच्या फायली आढळून आल्या आहेत. दोन कामांच्या फायली गायब झाल्या आहेत. प्रत्यक्ष काम न करताच शंभर टक्के बिल अदा करण्यात आले असल्याच्या या फायली आहेत. त्यामुळे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील त्या उपलब्ध शकल्या नाहीत, अशी चर्चा महापालिका वर्तुळत सुरू होती.

अधिकाऱ्यांची पाठराखण :- महापालिका प्रशासनाने ठेकेदारांवर कारवाई केली खरी; परंतु त्यामध्ये काही अधिकऱ्यांचादेखील समावेश आहे. त्यांच्यावर मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही. केवळ ठेकेदारांवर दोष टाकून महापालिका प्रशासनाने हात वर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker