अबब ! पेट्रोल-डिझेल चढ्या किमतींनी विकल्याने इंडियन ऑईलने कमावला तब्बल ‘इतका’ नफा ?

MHLive24 टीम, 31 जुलै 2021 :-  देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च स्थानी गेले आहेत. दररोज नवनवीन आकडे किमती वाढवीत आहेत. दरम्यान या मध्ये विविध गोष्टी असतात उदा. डीलर लोकांचे मार्जिन , सरकारचा कर आदी. यातून तेल कंपन्यांना देखील जास्त मार्जिन होत असते. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑईलकडून नुकताच तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला.

एप्रिल-जून तिमाहीत इंडियन ऑईलचा नफा दुप्पट झाला आहे. या तिमाहीत कंपनीने 5941 कोटींचा नफा कमावला. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 1911 कोटींचा नफा झाला होता. इन्व्हेंट्री गॅस आणि पेट्रोकेमिकल मार्जिनमुळे नफा वाढल्याचे इंडियन ऑईलकडून सांगण्यात आले.

गेल्या तिमाहीत इंडियन ऑईलला एकूण 1,55,056 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी हाच महसूल 88,939 कोटी रुपये होता. एप्रिल- ते जून या काळात इंडियन ऑईलने 20.325 कोटी टन उत्पादनांची विक्री केली. या काळात रिफायनिंग उत्पादन 16.719 कोटी टन इतके राहिले तर पाईपलाईन नेटवर्क उत्पादन 19.875 मिलियन टन इतके राहिले.

Advertisement

असे ठरवतात किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker