खडकवासला प्रकल्पात ७९ टक्के पाणी

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये मागील चार दिवसांत पाणीसाठ्यात पाच अब्ज घनफुटांनी (पाच टीएमसी) वाढ झाली आहे. शहराला जवळपास सुमारे तीन महिने पुरेल इतका हा पाणीसाठा आहे.

१३ टीएमसीने अधिक पाणी :- खडकवासला प्रकल्पात सोमवारी सायंकाळपर्यंत २३ टीएमसी (७९ टक्के) पाणीसाठा झाला असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टीएमसीने अधिक आहे. गेल्या वर्षी खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ९.८६ टीएमसी पाणीसाठा होता.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस :- खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. सोमवारी दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिलिमीटर, वरसगाव २३ मिलीमीटर, पानशेत २४ मिलीमीटर आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Advertisement

‘उजनी’त १८ टीएमसीची वाढ :- उजनी धरणात २३ जुलै रोजी केवळ ०.९१ टीएमसी (१.७० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणात १८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker