30 वर्षांचे होण्याआधीच शून्यातून कोट्यवधींचा व्यवसाय उभारणारे ‘हे’ आहेत 5 भारतीय बिझनेसमन

MHLive24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- शून्यातून व्यवसाय उभारण्यासाठी रक्त, घाम आणि अश्रू गाळावे लागतात. या अडचणींवर मात करणारे उद्योजक हे इतरांसाठी उदाहरणे ठरतात. आज अशाच पाच भारतीय उद्योजकांच्या यशोगाथा आपण पाहणार आहोत ज्यांनी त्यांच्या 30 व्या वर्षात करोडोचा व्यवसाय उभा केला.( Indian businessmen )

१. बाला सारडा, वाहदम टीज

चहा निर्यातदारांच्या कुटुंबातून आलेले, बाला सारडा हे चहा उद्योगाची पुरेशी माहिती असलेल्या वातावरणात वाढले.

Advertisement

2015 मध्ये, वयाच्या 23 व्या वर्षी, बालाने नवी दिल्ली येथे वाहदम टीची स्थापना केली – एक डिजिटली नेटिव्ह, वर्टिकल इंटिग्रेटेड ग्लोबल वेलनेस ब्रँड – जो भारतातील सर्वोत्तम चहा जगाला पाठवतो.

भारतीय चहाला मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी, बाला यांना असे वाटले की भारतामधील ब्रँड परदेशातील बाजारपेठेत कार्यक्षमतेने ठेवला जात नाही. USDA प्रमाणपत्र आणि नॉन-GMO पडताळणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी यूएसला चहा निर्यात करून सुरुवात केली.

वाहदम टीजने त्यानंतर मोठी घोडदौड केली. अमेरिकेत दखल घेतली गेलेला आणि प्रिमियम, लीगल रिटेल चेन असलेला असलेल्या काही तुरळक भारतीय ब्रॅंडमध्ये वाहदमचा समावेश आहे. कंपनीची उलाढाल १४५ कोटी रुपयांच्या वर पोचली आहे. वाहदमचे अमेरिकेत १५ लाख ग्राहक आहेत.

Advertisement

२. रिषभ चोखानी, नॅचरेवाईब बोटॅनिकल्स

वयाच्या 29 व्या वर्षी जेव्हा ऋषभ चोखानीने आरोग्यदायी आहार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांवर त्याचा विश्वास बसत नव्हता. परिवर्तन दिसायला वेळ लागला नाही, आणि परिणाम आश्चर्यकारक होते – शारीरिक आणि मानसिक दोन्ही. रिषभला ऑर्गेनिक फूड क्षेत्रातील क्षमता लक्षात आली आणि त्याने २०१७ मध्ये मुंबईत नॅचरेवाईब बोटॅनिकल्सची सुरूवात केली.

रिषभने अमेरिकेत बाजारपेठेत आपला माल विकण्यास सुरूवात केली. नंतर त्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार युरोपातदेखील केला. रिषभ विविध ६५० प्रकारच्या उत्पादनांचे उत्पादन घेतो. त्याच्या व्यवसायाची उलाढाल १४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Advertisement

३. जय के मुलचंदानी, कोअरबी समूह

जय के मूलचंदानी फक्त १४ वर्षांचा होता तेव्हापासून तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. तो मूळचा राजस्थानातील आहे. नोकरीत त्याचे मन रमले नाही. त्यानंतर जयने ट्रक विकून कमिशन कमवण्यास सुरूवात केली.

त्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत सेल्स मॅनेजरची नोकरी मिळाली. ते काम करताना त्याच्या लक्षात आले की सेकंड हॅंड आणि जुन्या ट्रकला मागणी आहे. यातूनच त्याला स्वत:च्या व्यवसायाची कल्पना सुचली. कोअरबी ग्रुपची स्थापना त्यानंतर झाली. या व्यवसायात त्याचे चांगलेच बस्तान बसले. आता त्याची उलाढाल १०० कोटींच्या आसपास आहे.

Advertisement

४. केशव राय, बाईक ब्लेझर

२७ वर्षीय केशव राय हा एक सर्वसाधारणच विद्यार्थी होता. मात्र त्याला व्यवसायात रस होता. २०१५ मध्ये त्याने वडिलांच्या मदतीने अॅपवर आधारित व्यवसाय सुरू केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.

आपली बाईक स्वच्छ करताना, त्यावर धूळ झटकताना त्याला एक कल्पना सुचली आणि २०१६ मध्ये त्याने बाईक ब्लेझरची स्थापना केली. बाईक ब्लेझर दुचाकी वाहनांना वॉटर रेझिस्टंट पार्किंग कव्हर पुरवते. बाईक ब्लेझरची वार्षिक उलाढाल आता १.३ कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

Advertisement

५. पल्लव बिहानी, बोल्डफिट

तंदुरुस्त असणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. पंचवीस वर्षीय उद्योजक पल्लव बिहाणी यांना शाळेत असताना स्लिप्ड डिस्कचा त्रास झाला तेव्हा त्यांना हे खूप लवकर कळले. त्याचे वजन १०५ किलो होते. त्यानंतर त्याने आपल्या फिटनेसवर लक्ष देण्यास सुरूवात केली. जिममध्ये जाण्यास सुरूवात केली.

भारतात फिटनेस हा स्वस्त पर्याय नाही असे त्याच्या लक्षात आले. बहुतांश लोक फिटनेससाठी लागणरी सप्लीमेंट्स, उपकरणे घेऊ शकत नाहीत. २०१९ मध्ये पल्लवने बोल्डफिटची सुरूवात केली. त्याने फिटनेसशी निगडीत ई-कॉमर्स ब्रॅंड सुरू केला. त्यासाठी त्याने वडिलांकडून ८ लाख रुपये उसनवार घेतले.आज बोल्डफिटचा विस्तार झाला आहे. त्याची उलाढाल ३० कोटी रुपयांच्यावर पोचली आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker