२१ हजार कोटी खर्च, तरी मुंबई खड्ड्यात!

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- गेल्या दोन दशकांत मुंबई महापालिकने रस्त्यावर तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्च केले. म्हणजे वर्षाला एक हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. मुंबईतील रस्त्यात खड्डे, की खड्डयात रस्ते असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे.

रस्त्यांच्या कामांची हजारो कोटींची उड्डाणे :- मुंबई महापालिका दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पात रस्तेकामांसाठी दीड ते दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करते. यामध्ये नवीन सिमेंट काँक्रीट आणि डांबरी रस्ते बांधले जातात, तसेच जुन्या रस्त्यांची डागडुजी केली जाते.

१९९७ ते २०२१ या २४ वर्षांत रस्तेबांधणीवर तब्बल २१ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेने भाजपचे आमदार अमित साटम यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. यामध्ये २०१४-१५मध्ये सर्वाधिक ३२०१ कोटी, तर पुढच्या वर्षी २०१५-१६मध्ये २३०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. दोन दशकांपूर्वी वार्षिक ८० ते १०० कोटींमध्ये होणाऱ्या रस्त्यांच्या कामांनी आता हजारो कोटींची उड्डाणे घेतली आहे.

Advertisement

कोरोनावर दोन हजार कोटी रुपये खर्च :- कोरोनामुळे पालिकेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये कोरोनासंबंधी उपाययोजनांवर खर्च झाले आहेत. नाजूक आर्थिक स्थितीमुळे इतर विकासकामांना कात्री लावण्यात आली असताना पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते बांधणीसाठी मात्र पैसे कमी पडू दिलेले नाहीत. १६०० कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी सुमारे एक हजार कोटींच्या निविदादेखील निघाल्या आहेत.

रस्तेबांधणीचा दर्जा निकृष्ट :- रस्ते कामांसाठी हजारो कोटी रुपये खर्च होत असताना रस्तेबांधणीचा दर्जा मात्र निकृष्ट आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण कायम आहे. यंदाच्या पावसाळ्यातही हीच स्थिती आहे. करदाते म्हणून मुंबईकरांकडून हजारो कोटी वसूल केले जात असताना सुमार रस्ते कामामुळे पालिकेला मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. २०१६ मध्ये पालिकेत रस्ते बांधणी घोटाळा उघडकीस आला होता. काही कंत्राटदार व पालिकेच्या इंजिनीअरना जेलची हवा खावी लागली होती. त्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker