Mhlive24 टीम, 27 डिसेंबर 2020 :–सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे कार्तिक पौर्णिमेला उत्तरेश्वर देवाची प्रसिद्ध यात्रा भरते.तिथे भरलेल्या जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचा वंश असलेल्या बोकडाची चर्चा महाराष्ट्रभर रंगली होती.
त्या बोकडाला आटपाडीच्या बाजारात ७० लाखाचा बाजार भेटला पण त्यांनी तो विकला नाही. मात्र त्यातील एक बोकड १६ लाखांना विकला गेला आहे. आता हाच बोकड चोरीला गेला आहे.
शनिवारी पहाटे चोरटयांनी गोठ्यात शिरून बोकड चोरला आहे. उल्लेखनीय बाबा म्हणजे बोकड चोरायला चोर आलिशान गाडीतून आले होते.हा बोकड चोरला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मोदी बोकडाची देशभरात चर्चा झाली तो बोकडा बाबुराव मेटकरींचा असल्याचं कळतय. त्यांनी बाजारात मोदी बोकड आणला होता. त्याच्यावर ७० लाखांची बोली लावली गेली पण त्यांनी तो विकला नाही.
त्यांना तो बोकड दीड कोटीला विकायचा होता.याच बाजारात त्यांनी मोदी बोकड्याचा अंश आणला होता. तो १६ लाखांना विकला गेला. जो आटपाडीच्या बाजारात सोमनाथ जाधव यांनी विकत घेतला . महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आटपाडी कार्तिक पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे.यावर्षी कोरोनामुळे ती यात्रा रद्द करण्यात आली. तिथे पशुपालक,मेंढपाळ मोठ्या संख्येने येत असतात. त्याऐवजी फक्त जनावरांचा बाजार भरतो.
बोकडाची १६ लाखांची किंमत काही कमी नाही.मात्र हौशीवाल्या लोकांना किंमत नसते. पोलिसांसमोर चोर शोधण्याचं मोठ आव्हान असणार आहे. बोकड शोधून देणाऱ्यांसाठी जाधव यांनी बक्षीसही ठेवल्याची माहिती येत आहे.