बारावीचा निकाल ३१ जुलैपूर्वीच

MHLive24 टीम, 27 जुलै 2021 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचे कामकाज जवळजवळ पूर्ण झाले आले आहे. 31 जुलैपूर्वी बारावीचे निकाल जाहीर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते, त्या मुदतीपूर्वीच राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

घोषणा लवकरच :- मंडळाने हा निकाल जाहीर करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठीची घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यात कोल्हापूर आणि कोकणात अतिवृष्टी झाल्याने काही भागातून निकालाची माहिती येणे बाकी असून उर्वरित ठिकाणची माहिती मंडळाकडे आली असल्याने हा निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असेही सांगण्यात आले.

अंतर्गत मूल्यमापन पूर्ण :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावीप्रमाणेच बारावीची परीक्षाही रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर आधारित उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि प्राचार्याकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कामकाज नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यासाठीची संपूर्ण यादी मंडळाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामुळे

Advertisement

एक महिना उशीर :-  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला होता. मात्र तब्बल महिन्याभरानंतर त्यासाठीच्या मूल्यमापन कार्यपद्धती ठरविण्यात आली.

त्यानंतर जीआर जारी करून कार्यवाही सुरू करण्यात आली होती; मात्र मंडळाकडून मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात निर्णय घेण्यास मोठा उशीर लावल्याने यासाठी महिनभराहून अधिक काळ वाया गेला असल्याचे सांगण्यात आले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker