शिवसेनेच्या सत्ताकाळात १,२५,००० कोटींचा घोटाळा – आशिष शेलार

MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- शिवसेनेच्या सत्ताकाळात मुंबई महानगरपालिकेत १,२५,००० कोटीं रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार श्री. आशिष शेलार यांनी केला आहे. आमदार श्री. आशिष शेलार म्हणाले की, हा सर्व पैसा सामान्य नागरिकांचा आहे आणि तो जनतेसाठी खर्च होणं भाग होतं. वांद्रे पूर्व येथील आयोजित चौपाल कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई भाजपा उपाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. राजहंस सिंह म्हणाले की, चौपालच्या माध्यमातून आम्ही समाजातील सर्व घटकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. महानगरपालिकेची सत्ता येताच सर्व उत्तर भारतीयांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याची व्यवस्था करू. दैनंदिन छोट्या प्रशासकीय कामांसाठी धक्के खाण्याची गरज भासणार नाही.

मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष दिलेलं वचन पूर्ण करते. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वात मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.

Advertisement

यावेळी कार्यक्रमात मुंबई भाजपा उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष श्री. जय प्रकाश सिंह, सचिव श्री. महेश पारकर, प्रवक्ते आणि मिडिया सह प्रभारी श्री. उदयप्रताप सिंह, जिल्हा अध्यक्ष श्री. सुषम सावंत, सरचिटणीस श्री. नितेश राजहंस सिंह, श्री. अनिल उपाध्याय, श्री. रमाकांत गुप्ता, अॅड. विरेंद्र दुबे, श्री. दीपक सिंह, श्री. गुलाब दुबे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री पंकज पांडे आणि त्यांच्या टीमने केले होते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker