१२ आमदारांची निलंबिनाविरोधा सर्वोच्च न्यायालयात धाव

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- विधानसभेत गोंधळ घालणे, राजदंड पळवणे, तालिका अध्यक्षांना आईबहिणीवरून शिवीगाळ करणे आणि धक्काबुक्की प्रकरणावरून निलंबित केलेल्या भाजपच्या १२ आमदांरानी निलंबनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

एक वर्षाचे निलंबन :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदारांनी मोठा गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजप आमदारांवर करण्यात आला.

त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या या कारवाईविरोधात भाजपच्या 12 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपच्या निलंबित आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात चार याचिका दाखल केल्या आहेत, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली.

Advertisement

निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा :- भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन हे चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदेशीररित्या करण्यात आल्याचे आम्ही आधीच म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली आहे. या 12 आमदारांचे आम्ही चार गट केले आहेत आणि चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत.

ज्या ठरावाद्वारे आम्हाला निलंबित करण्यात आले, तो बेकायदेशीर असल्यामुळे तो ठराव अवैध ठरवण्यात यावा, असे प्रतिज्ञापत्र आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. निलंबनाच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती मिळावी आणि याचिकेवर निर्णय येईपर्यंत आमदारांना त्यांचे सर्व अधिकार बहाल करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू, असे त्यांनी सांगितले.

आवाजी बहुमताने ठराव मंजूर :- विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजप आमदारांनी आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला. आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या. हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.

Advertisement

त्यानंतर या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्यानंतर आवाजी बहुमताने भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker