मास्को : पहिला विश्वचषक पटकावण्याचा मान मिळवणाऱ्या क्रोएशियाने माजी विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाचा ३-० असा दारुण पराभव केला. विश्वातील सर्वोत्तम खेळाडूचा पाचवेळा पुरस्कार मिळवणाऱ्या मेस्सीच्या अर्जेंटिना संघाला यंदाचा संभाव्य विजेता म्हणून पसंती दिली जात असताना मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मात्र असंख्य फुटबॅालशौकिनांची निराशा केली. 

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनॅल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोघांमध्ये कोण सरस ठरणार, अशी चर्चा सुरू असताना रोनॅल्डोने एका हॅट्ट्रिकसह दोन सामन्यांतून चार गोल झळकावण्याचा पराक्रम केला, तर लिओनेल मेस्सीची पाटी मात्र तेवढ्याच सामन्यांतून अद्याप कोरीच आहे