मुंबई : संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. या सिनेमात अभिनेता राम अवतार भारद्वाज हे अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसतील.

सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत असणारे अभिनेते अनुपम खेर यांनी राम अवतार भारद्वाज यांच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.


याबाबत ट्विट करत अनुपम खेर यांनी म्हटलं आहे, ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत राम अवतार भारद्वाज यांना सादर करत आहोत.