जीप कंपासच्या यशानंतर कंपनीने आता जीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशन ही नवी गाडी बाजारात आणली आहे. सपोर्ट ट्रीम प्रकाराची बेडरॉक २.० लिटर १७३पीएस टर्बो डिझेल इंजिन, सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, ४७२ प्रकारातील ड्रायव्हिंग कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३१ जुलै २०१७ रोजी भारतात सादर झालेली जीप कंपास ही आज भारतीय रस्त्यांवरील सर्वात सुरक्षित एसयूव्ही म्हणून वाखाणली जात आहे. या गाडीने निश्चितपणे भारतीय एसयूव्ही बाजारपेठेला अधिक आव्हानात्मक बनवले असून, स्पर्धकांना कडवी टक्कर दिलेली आहे. 
तसेच येथील ग्राहकांच्या फोर व्हिलर खरेदी करण्याच्या शैलीमध्ये लक्षणीय परिवर्तन घडवून आणतानाच त्यांच्या आकांक्षांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जीप कंपास बेडरॉक लिमिटेड एडिशनमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, १६ इंची ग्लॉस अलॉय ब्लॅक व्हील्स, गाडीत सुलभतेने चढता यावे यासाठी साईड स्टेप, बेडरॉक ब्रँडचे सीट कव्हर्स, ब्लॅक रूफ रेल्स, प्रीमियम दर्जाच्या फ्लोअर मॅटस, बेडरॉक डिकॅल्स आणि बेडरॉक मोनोग्राम अशा खास घटक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.