अभिनेता रजनीकांतबरोबर आतापर्यंत बॉलिवूडशिवाय साऊथमधील अनेक बड्या अभिनेत्रींनी चित्रपट केले आहेत. आता ही संधी काजल अग्रवालला देखील मिळू शकते. सूत्रांनी सांगितले की, रजनीकांत सध्या कार्तिक सुब्बराज यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या एका चित्रपटात काम करत असून, यामध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी काजलला अप्रोच करण्यात आले आहे. 

इतकेच नव्हे, तर दिग्दर्शकाने काजलला चित्रपटाची कथा ऐकवण्याबरोबरच यामधील तिच्या व्यक्तिरेखे विषयी देखील सांगितले आहे, परंतु अद्याप सर्व गोष्टी फायनल झालेल्या नाहीत. यापूर्वी काजलने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चिरंजीवीबरोबरदेखील काम केले आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्याबरोबर काम करताना तिला फार काही वावगे वाटणार नाही आणि ती लवकरच कार्तिक सुब्बराज यांच्या चित्रपटात काम करण्यास तयार होऊ शकते