Mhlive24 टीम, 27 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात आज ७ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
तसेच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३९ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५ हजार ३६३ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. दरम्यान आजपर्यंत राज्यात १६ लाख ५४ हजार ०२८ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर