Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:– मुळा कालव्यातील पाणी कालव्यांमधून जात नसताना पाण्याचे अपव्यय होऊन शेतीतील पिकांचे नुकसान होत असल्याने या प्रकरणाकडे लक्ष न देणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मराठा सेवा संघ पाथर्डी तालुका व संभाजी ब्रिगेडच्या वतीने सिंचन भवन, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रामदास बर्डे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रामेश्वर कर्डिले उपस्थित होते. हनुमान टाकळी (ता. पाथर्डी) येथे कोपरे हद्दीतील मुळा कालवा मधील पाणी कालव्यांमधून न जाता कालवा सोडून जात आहे. गेल्या सहा दिवसापासून पूर्ण दाबाने पाणी सोडल्यामुळे कालवा शेजारील शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर पाणी कोणाच्याही उपयोगाला येत नसून, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सदर प्रश्नाकडे कर्मचार्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाणी पुढे न जाता मध्येच अडकून कालव्याबाहेरुन जात असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. वारंवार शेतकर्यांनी संपर्क करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
सदर भाग दुष्काळी पट्टयाचा असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होत असताना संबंधीत अधिकार्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्यांच्याकडून नुकसानापोटी वसुली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर