‘त्या’ भेटीवरून उलथापालथ? खा.शरद पवार, मंत्री थोरात ‘वर्षा ‘वर

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :-भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात  ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात गुप्त बैठक झाली. 

या बैठकीनंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची चर्चा होऊ लागली. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही भेट याच पार्श्वभूमीवर होती अशीही चर्चा होऊ लागली आहे.

Advertisement

दरम्यान,  भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी “संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती असे ते म्हणाले होते.

आपण जे बोलू त्यात काटछाट होणार नसेल, तरच आपण ‘सामना’ला मुलाखत देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्याचे स्वरूप ठरवण्यासाठी या दोघांची भेट झाली, असे दरेकर म्हणाले होते.

मात्र या भेटीमुळे नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होणार का, शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा जवळीकीचे प्रयत्न सुरू आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

Advertisement

या भेटीबाबत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस-राऊत यांच्या भेटीला फारसे महत्व देण्याचे नाकारले.

 तर, शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असते. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीने देखील पवार-ठाकरे भेट ‘रुटिन’ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात मुख्यमंत्री आणि शरद पवार असंख्यवेळा भेटले आहेत. 

Advertisement

कधी ते मातोश्रीवर गेले, कधी महापौर बंगल्यावर भेट झाली, तर कधी वर्षावर. दर वेळी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या कामांचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यामुळे त्यात नवीन काही नाही, सरकार व्यवस्थित चालू आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker