पोलिसांना गुंगारा देत सरकारच्या नाकावर टिच्चून पडळकरांची बैलगाडा शर्यत पार!

MHLive24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही नाही, असा चंग शासन आणि प्रशासानाने बांधला होता.

तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला होता. अखेर आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला.

पोलिसांचा मोठा फौजफाटा, मात्र पडळकर आणि समर्थकांनी गुंगारा देऊन बैलगाडा शर्यत भरवलीच! :- गोपीचंद पडळकर आयोजित बैलगाडा शर्यतीला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगलीच्या झरे गावात आणि सगळ्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Advertisement

त्यामुळे बैलगाडा शर्यत होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र पडळकर समर्थकांनी मोठ्या शिताफीने पोलिसांना आणि प्रशासनाला गुंगारा दिला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker