Take a fresh look at your lifestyle.

हा’ धोकादायक मेसेज करतोय WhatsApp क्रॅश

0

Mhlive24 टीम, 8 सप्टेंबर 2020 :-   सर्वाधिक लोकप्रिय व सर्रास चॅटिंगसाठी वापरण्यात येणारे मोबाईल अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Advertisement

मात्र सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेगळेच मेसेज येत आहेत. हे मेसेज रिसिव्ह होताच अ‍ॅप क्रॅश होतो किंवा फ्रीज होतो. हे मेसेज लांब आणि स्पेशल कॅरेक्टर्सच्या मदतीने लिहिले आहेत. त्यामुळे डिकोड करू शकत नाही. त्यामुळे अ‍ॅप क्रॅश होण्याची अडचण येत आहे.

Advertisement

ब्राझील सह जगातील अनेक युजर्संना ही समस्या येत आहे. WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, या मेसेजमध्ये वेगळ्याच कॅरेक्टर्सचा वापर केल्याने याचा काहीच अर्थ निघत नाही. अनेकदा मेसेज पूर्णपणे रिड होत नाही. कारण, त्यांचा स्ट्रक्चर पूर्णपणे वेगळा असतो.

Advertisement

या मेसेजच्या कॉम्बिनेशनमुळे मेसेजची प्रोसेस पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे ते क्रॅश होते. अ‍ॅप क्रॅश झाल्यानंतर अ‍ॅप ओपन होत नाही. युजर वारंवार अ‍ॅप ओपन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, काही फरक पडत नाही. जगभरातील युजर्संनी या समस्यांसंबंधी रिपोर्ट केले आहे.

Advertisement

परंतु, ब्राझीलच्या युजर्संना सर्वात जास्त अडचण येत आहे. आपले अकाउंट असे करा सेफ जर तुम्हाला असे वेगळे कॅरेक्टरचे मेसेज येत असतील त्याला तात्काळ ब्लॉक करा. कॉन्टॅक्ट ब्लॉक केल्यानंतर ग्रुपच्या प्रायव्हसी सेटिंगला ‘My Contacts’ किंवा ‘My Contacts Except’वर सेट करा.

Advertisement

असे करूनही समस्यां दूर झाली नाही तर तर व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करा व पुन्हा इन्स्टॉल करा. त्यामुळे तुमची चॅट हिस्ट्री डिलीट होवू शकते.

Advertisement
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li