Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

‘या’ अभिनेत्रीला चोरांनी दाखविला हात!

0 113

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :-  मुंबई : शिवाजी पार्क येथे फेरी मारून तेथील एका कट्ट्यावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर बसल्या असता, एक माणूस वेळ विचारण्यास आला; मात्र वेळ सांगण्यास मालपेकर यांनी नकार दिला. त्यानंतर पुन्हा मागे फिरून त्याने सविता मालपेकर यांच्या गळ्यातील चेन खेचली, या झटापटीत त्यांचे कपडे फाटले.

मराठी मनोरंजन विश्वातील मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरांनी पळ काढल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क सारख्या गजबजलेल्या ठिकाणी बाकड्यावर बसलेल्या अभिनेत्रीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरट्यांनी पळ काढल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नेमकं काय झालं?

हा प्रकार घडत असताना सविता मालपेकर यांनी आरडाओरड केली. आजूबाजूचे लोक जमले, तोवर चोरटा बाईकवरून फरार झाला होता. पोलिस अधिकारी काही क्षणातच घटनास्थळी आले. सर्व माहिती घेऊन राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळखही पटली. हा चोरटा माहीमचा निवासी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही गरजेचा!

या घटनेबाबत मालपेकर यांनी सांगितले, की शिवाजी पार्क हे नेहमीच गर्दीचे ठिकाण आहे; मात्र या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा नाही. सीसीटीव्ही फक्त मुख्य प्रवेशद्वाराजवळच आहे. सर्व गेटवर सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे. येथे ज्येष्ठ नागरिक, छोटी मुले महिला यांचा वावर असतो. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटिव्ही यंत्रणा असणे आवश्यक आहे.

Advertisement

कोण आहेत सविता मालपेकर

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते.

याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.‘हाहाकार’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘गड्या आपला गाव बरा’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘नटसम्राट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘शिकारी’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘7 रोशन व्हिला’ अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्यंनी काम केलं.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup