Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

आमदार पवारांच्या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये देखील कमालीचे दहशत पसरली आहे.

Advertisement

यातच आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात चोरटे सक्रिय झाले आहे. दरदिवशी होणारी चोऱ्या व पोलिसांकडून होणारी निराशाजनक कारवाया यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढते आहे, तर दुसरीकडे नागरिकांचे मनोबल खचले आहे.

Advertisement

नुकतेच पुन्हा एकदा जामखेडमध्ये चोरीची घटना घडली आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथे भरदिवसा घरफोडी होऊन एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. येथील ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी कि, मोहरी गावाच्या रस्त्यालगतच राहणाऱ्या चंद्रभान माणिक वाघमारे यांच्या घराचे कुलूप भरदिवसा दुपारीच फोडून चोरट्यांनी रोख ६० हजार व इतर घरातील ऐवज असा एक लाख ५६ हजारांचा ऐवज लंपास केला.

Advertisement

याबाबतची फिर्याद त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल केली. काही दिवस अगोदर मोहरी गावात दिवसा घरफोडी झाली होती.

Advertisement

जामखेड तालुक्यातील लोणी येथील बबन विश्वनाथ परकड व अरुण परमेश्वर परकड यांच्या बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी चोरी केली.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement