Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

राज्यात आता असे आहेत निर्बंध वाचा सविस्तर माहिती !

0 4

MHLive24 टीम, 28 जून 2021 :- डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्य सरकारने सोमवारपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू असलेल्या

निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळे, खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भातील नियमांची माहिती दिली आहे.

Advertisement

मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यासह राज्यातील ३३ जिल्ह्यांत सोमवारपासून स्तर तीनचे निर्बंध असतील. राज्य सरकारने नव्याने मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.

त्यानुसार १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर बंदी असेल, तर बांधकामाच्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांहून अधिक संख्येने काम करता येणार नाही.

Advertisement

मेळावा अथवा संमेलनाचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असणार नाही. या ठिकाणी नियमाचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांला पूर्णपणे बंद केले जाईल.

कोरोना आपत्ती असेपर्यंत त्यांना उघडण्याची मुभा मिळणार नाही. तीन, चार व पाचव्या स्तरातील धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद असतील.

Advertisement

जेथे लग्नकार्य व अंतिमसंस्कार केले जातील, अशा स्थळी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

पर्यटनस्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेल्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. संबंधित पर्यटनस्थळ स्तर पाचमध्ये येत असेल तर ई-पासशिवाय पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.

Advertisement

तसेचं पर्यटक स्तर पाचमधून येत असतील तर त्यांना एका आठवड्यासाठी विलगीकरणात राहावे लागेल. पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरातील हॉटेल्स उघडी ठेवण्याची परवानगी असेल. क्षमतेच्या अटीवर हॉटेलमधील उपाहारगृहे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी सुरू ठेवण्यात येतील.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement