आपत्तीत धावून जाणं, मदत करणं, मदतीसाठी प्रयत्न करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे

मुंबई :भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पूरग्रस्त भागात केलेल्या दाै-याची संभावना खासदार संजय राऊत यांनी, ‘विरोधकांचा  पर्यटन दाैरा’ अशी केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

विरोधी पक्ष लोकशाही व्यवस्थेचे भाग

राज्याचं विधिमंडळ, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते हेदेखील याच लोकशाही व्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत आणि तेही घटनात्मक मार्गानेच त्या पदावर आहेत, याचं विस्मरण होऊ देऊ नका, असा सल्ला दरेकर यांनी राऊत यांना दिला.

Advertisement

टीकेला प्रत्युत्तर

शिवसेनच्या मुखपत्रात दरेकर यांच्या कोकण दौऱ्यावर ‘पर्यटन दौरा’ म्हणून टीका करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘आम्हीही लोकशाहीचे अविभाज्य भाग आहोत, लोकशाहीचे थट्टा करू नका, अशा शब्दांत दरेकर यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले दरेकर?

Advertisement

ज्यावेळी कोकणातील भीषण पूरपरिस्थितीबाबत मला माहिती मिळाली, तेव्हा मुंबईत थांबणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे तातडीने मी सहकाऱ्यांसह कोकणाकडे धाव घेतली. फक्त याच वेळी नाही, तर ‘निसर्ग’सारख्या संकटातदेखील त्याच रात्री मी कोकण गाठलं होतं. आपत्तीत धावून जाणं, मदत करणं, मदतीसाठी प्रयत्न करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे दरेकर म्हणाले.

लोकशाहीची थट्टा अयोग्य

“महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे,” हे कुणीच नाकबूल करणार नाही, असे नमूद करून दरेकर म्हणाले, की घटनास्थळी जाऊन लोकांना धीर देणं, सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रितपणे या संकटाशी मुकाबला करीत आहेत.

Advertisement

हा विश्वास निर्माण करणं, प्रशासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेणं आणि त्रुटी सरकारच्या निदर्शनास आणून देणं, हे विरोधी पक्ष नेतेपदाच्या कर्तव्याचा एक भाग आहे, त्याला पर्यटन संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker