Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

घरातील ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा -शितल जगताप

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:रथसप्तमीनिमित्त प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांनी या कार्यक्रमात उत्सफुर्तपणे सहभागी होऊन विविध कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. पारंपारिक वेशभुषा परिधान करुन महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका शितल जगताप, एस्ट्रोलॉजिस्ट अभिलाषा, वैशाली ससे, रेशमा आठरे, ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, उपाध्यक्षा अनिता काळे, पुष्पा मालू, डॉ.योगिता सत्रे, शकुंतला जाधव, मनिषा देवकर, शोभा पोखरणा, शोभा झंवर, दिप्ती मुंदडा, दिपा मालू, शशीकला झरेकर, आशा गायकवाड आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.

Advertisement

प्रास्ताविकात अनिता काळे यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुप विविध उपक्रम घेण्यात येतात. कोरोनामुळे बर्‍याच महिन्यानंतर सर्व महिला एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण झाली असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

पाहुण्यांचे स्वागत अलका मुंदडा यांनी केले. कु.निष्ठा सुपेकर हिने हार्मोनियमवर बहारदार स्वागत गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. नगरसेविका शितल जगताप म्हणाल्या की, हळदी-कुंकू कार्यक्रमात विचारांचे वाण सर्वश्रेष्ठ आहे. या कार्यक्रमाद्वारे महिला एकत्र येवून आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात.

Advertisement

ज्येष्ठ महिला कुटुंबाचा कणा असून, ज्या समाजात महिलांना सन्मान आहे, ते आज प्रगतीपथावर आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा अनुभव व मार्गदर्शन जीवनात दीपस्तंभा प्रमाणे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एस्ट्रोलॉजिस्ट अभिलाषा यांनी महिलांना वास्तुशास्त्र, हस्तरेषा, अंकशास्त्राची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

Advertisement

या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात दिपा मालू यांनी बौध्दिक, तंबोला व उखाणे स्पर्धांसह सामान्यज्ञानसह विविध बौध्दिक व मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या. यामध्ये शारदा नहार, कुसूम सिंग, स्वाती नागोरी, तारा लड्डा, राखी खिवंसरा यांनी बक्षिस पटकाविले.

Advertisement

विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा झंवर यांनी केले. आभार दिप्ती मुंदडा यांनी मानले.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement