Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:–न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चे माजी विद्यार्थ्यांची संवाद प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने कु. पूर्वजा बोज्जा ही कथक पदविका परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम आल्याबद्दल तिचे सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भूतारे म्हणाले पूर्वजाने कथक पदविका परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम येऊन नगरचे नाव उंचावले याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन पूर्वजाने प्रामाणिक परीक्षण केल्यामुळेच
तिला हे यश प्राप्त झाले यापुढेही तिने अशाच पद्धतीने कथक मध्ये आणखी परिश्रम घेऊन नगरचे नाव भारतात करावे. तिच्या शिक्षकांचे व तिच्या आई वडिलांचेही अभिनंदन त्यांनी ही तिला सदर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी संवाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भुतारे व खजिनदार सौ रुपाली मॅथयू यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या वेळो संवाद प्रतिष्टान चे विनय गुंदेचा सौ संगीता पवार -शेरकर, संजय भालेराव नरेश कांबळे सौ स्वाती कुलकर्णी, आदिनाथ भोसले, अपर्णा रासकर, सौ अरुणा बोरकर -पठारे, वैशाली बोठे, संवाद प्रतिष्ठानचे सचिव श्रीनिवास बोज्जा व माजी नगरसेविका सौ वीणाताई बोज्जा उपस्थित होते
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर