Take a fresh look at your lifestyle.

पंढरपुरातील ‘ती’ घटना; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ‘हा’ शब्द

0

Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या कुंभार घाटा शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या घाट कोसळला. या घाटाच्या भरावाखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

पंढरपुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पवार यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ६२३ गावे पुराने बाधित झाली आहेत. एक लाख ४५ हजार २३३ हेक्टरवरील खरीप पिके बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

या नुकसानभरपाई पासून एकही बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Advertisement

अजित पवार म्हणाले, परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यातील काही भागात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे.

Advertisement

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल, याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

Advertisement

दरम्यान , पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्राजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या घाटाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कामासाठी काळी माती वापरण्यात आली असून याकामी अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे.

Advertisement

यामुळे सहाजणांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपूर येथे दिले.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li