Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठीच्या ‘त्या’ योजनेत घोटाळा; जबाबदार कोण ?

0

Mhlive24 टीम, 17 ऑक्टोबर 2020 :- देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

तामिळनाडूमध्ये या योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्या 16 जणांना अटक करण्यात आली आहे. फुलप्रूफ सिस्टममध्ये सुद्धा लोक घोटाळा करू शकतील, असा विचारही कोणी करू शकणार नाही. तामिळनाडू, उत्तर प्रदेशनंतर आता

Advertisement

राजस्थानमध्ये देखील अपात्र लोकांना या योजनेचे पैसे मिळाल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील अवैधरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

Advertisement

त्यावेळी अपात्र म्हणजेच बनावट लोकांची आकडेवारी पाहून सरकार सुद्धा आश्चर्यचकित झाले. केंद्राकडून प्रत्येक राज्यात 5 टक्के शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन जरूरी केले आहे, तरी देखील या योजनेत घोटाळे कसे समोर येत आहेत?

Advertisement

या योजनेचे पैसे योग्य हातांमध्ये जावेत याकरता मोदी सरकारकडून काही बदल करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांची पात्रता जाणून घेण्यासाठी 5 टक्के शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन करायचे होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया होणार होती.

Advertisement

तरी देखील अशा बनावट लोकांना पैसे कसे मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्यांना पैसे मिळाले आहेत, त्यांचे आता व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याआधीच राज्य सरकारांना पत्र लिहून असे कळवले आहे

Advertisement

की जर अपात्र नागरिकांना या योजनेतील पैसे मिळाले आहेत तर ते कसे परत घेतले जातील. या लोकांना हे पैसे डीबीटी च्या माध्यमातून मिळाले आहेत तर ते डीबीटीच्या माध्यमातूनच परत घेतले जातील.

Advertisement

असे होणार व्हेरिफिकेशन :- लाभार्थ्यांच्या डेटाच्या आधारे व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर संबंधित एजन्सीला मिळालेली माहिती आधारशी समान असणारी मिळाली नाही, तर संबंधित राज्य किंवा केंद्रशासिन प्रदेशांना

Advertisement

त्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये सुधारणा किंवा बदल करावा लागेल. डिसेंबर 2019 पर्यंत सरकार 8 राज्यातील 1,19,743 लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले आहेत. कारण त्यांच्या नावात किंवा दिलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li