Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीचा निषेध

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

Advertisement

या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हाध्यक्ष अमोल भंडारे, युवक अध्यक्ष शहेबाज शेख, भिंगार शहराध्यक्ष अजय सोलंकी, प्रमोद ठाकूर, संतोष उदमले, मीजान कुरेशी,

Advertisement

श्रीपाद वाघमारे, संतोष त्रिंबके, लक्ष्मण साळे, बाबासाहेब त्रिंबके, वसीम शेख, गणेश निमसे आदी सहभागी झाले होते. देशात पेट्रोलने महागाईचे शतक पुर्ण केले असून, दिवसंदिवस डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहे.

Advertisement

अनेक सर्वसामान्य नागरिकांचे कोरोनामुळे रोजगार हिरावला गेला आहे. तर अनेकांच्या नोकर्‍या देखील गेल्या आहेत. दिवसंदिवस महागाई वाढत असताना सर्वसामान्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे.

Advertisement

मागील काळात क्रूड ऑइलचा भाव 110 ते 125 प्रति डॉलर असताना देखील पेट्रोल 80 आणि डिझेल 70 रुपये प्रति लिटर होते. जागतिक क्रूड ऑइलचा दर हा 60 ते 70 रुपये प्रति डॉलर असताना देखील केंद्र शासनाने लावलेल्या जास्तीत जास्त टॅक्समुळे सर्वच पेट्रोलियम पदार्थ महाग झाले असून, त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे इंधन दरावाढीने महागाईचा भडका उडाला आहे. सर्वच गोष्टी महाग होत चालल्या असून, केंद्र शासनाने गॅस, पेट्रोल, डिझेलवर लावलेले कर माफ करुन या गरजेच्या वस्तूंची किंमत अटोक्यात आनण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

इंधन दरवाढ अटोक्यात न आल्यास दहा दिवसानंतर नगर-पुणे महामार्गावरील चांदणी चौकात रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement