बीड ब्रेकिंग : करुणा शर्मांच्या गाडीत आढळलं पिस्तुल..Pistol found in Karuna Sharma’s car

MHLive24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- करुणा शर्मा या आज बीड मध्ये दाखल झाल्या आहेत. बीडमधील परळी शहरात करुणा शर्मा दाखल झाल्या असून त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे (Pistol found in Karuna Sharma’s car)

गेल्या अनेक महिन्यांपासून तसेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून समाज माध्यमातून आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आज थेट परळी गाठले. परळीत आपण पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

आज त्या नुसार करुणा शर्मा परळीत दाखल झाल्या, मात्र यावेळी परळी पोलिसांना त्यांच्या कार मध्ये एक पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

Advertisement

हे पिस्तूल त्यांचेच आहे का तसेच याचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.करुणा शर्मां कडून आपल्या जीविताला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी विविध माध्यमातून स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आज करुणा शर्मा पत्रकार परिषदे साठी आलेल्या असताना त्यांच्या कडे पिस्तुल का होते याबद्दल आता चर्चा सुरू झाली असून मुंडे परिवाराला त्यांच्या कडून घातपाताची शक्यता मुंडे समर्थक व्यक्त करत आहेत.

मी फक्त दर्शनासाठी आले असल्याचे सांगत करुणा मुंडे म्हटलं, मला गावात यायला का अडवता? असा प्रश्न उपस्थित करत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

मात्र परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे.

परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच स्थानिक ग्रामस्थही जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पहायला मिळत आहे. या प्रकरणात आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका घेतात हे पहावं लागेल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker