अरे बापरे ! ऑगस्टमध्ये महिन्यात ‘इतके’ दिवस बंद राहणार बँका

MHLive24 टीम, 24 जुलै 2021 :-  सध्या जुलै महिना संपत आला असून ऑगस्ट महिना सुरु होतोय. तरीही, राज्यात काही निर्बंध सुरुच आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. यातच आता ऑगस्ट महिन्यात आता काही दिवसही बँका बंद राहणार आहेत. कारण, बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

बँकांच्या सुट्ट्यांबाबतची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. ऑगस्ट महिन्यात जर तुमचे कोणते काम असेल तर, त्यांच्याकरीता बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार असेल, तर त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जाणून घेऊयात सुट्ट्यांची यादी – 1 ऑगस्ट 2021: हा दिवस रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 8 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

13 ऑगस्ट 2021: Patriot’s Day मुळे या दिवशी इम्फाल झोनमध्ये बँकेची सुट्टी असेल. 14 ऑगस्ट 2021 : या दिवशी दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. 15 ऑगस्ट 2021: रविवारी या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल, 16 ऑगस्ट 2021: पारसी नववर्षामुळे या दिवशी महाराष्ट्रातील बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागांमध्ये बँकेची सुट्टी असेल. 19 ऑगस्ट 2021: या दिवशी मोहरम, आगरतळा झोन,

Advertisement

अहमदाबाद विभाग, बेलापूर झोन, भोपाळ झोन, हैदराबाद विभाग, जयपूर विभाग, जम्मू विभाग, कानपूर विभाग, कोलकाता विभाग, लखनऊ विभाग, मुंबई विभाग, नागपूर विभाग, नवी दिल्ली झोन, पटना झोन, रायपूर झोन, रांची झोन आणि श्रीनगर झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल.

20 ऑगस्ट 2021: मोहरम आणि पहिल्या ओणममुळे बंगळुरू झोन, चेन्नई झोन, कोची झोन आणि केरळमध्ये झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. 21 सप्टेंबर 2021 रोजी थिरुवोणममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. 22 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

23 ऑगस्ट 2021: श्री नारायण गुरु जयंतीमुळे कोची झोन आणि केरळमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी असेल. 28 ऑगस्ट 2021: चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. 29 ऑगस्ट 2021: रविवार असल्याने हा दिवस बँकांची साप्ताहिक सुट्टी असेल. 30 ऑगस्ट 2021: अहमदाबाद झोन,

Advertisement

चंदीगड या दिवशी जन्माष्टमीमुळे चेन्नई विभाग, डेहराडून झोन, गंगटोक झोन, जयपूर विभाग, जम्मू विभाग, कानपूर झोन, लखनऊ विभाग, पाटणा विभाग, रायपूर विभाग, रांची विभाग, शिलाँग विभाग, श्रीनगर झोन, शिमला विभागात बँकांना सुट्टी असेल. 31 ऑगस्ट 2021: श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबाद येथे या दिवशी बँकांना सुट्टी असेल

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker