Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

शेतकऱ्यांसमोर नवे संकट; ऊसतोडीसाठी मिळेना मजूर

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:परिसरातील कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला तरी कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला टोळी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Advertisement

वारंवार ऊस नोंदणीबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधूनही टोळी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी लागवड करून उसाचे पीक घेतले आहे; परंतू कारखान्याच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Advertisement

उसाची टोळी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे जथेच्या जथे कारखान्यावर जात आहेत. मात्र, ऊसनोंदणी अधिकाऱ्यांकडून कोणतेही शाश्­वत उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संभ्रमावस्था आहे.

Advertisement

संबंधित अधिकारीही कुठलेही ठोस आश्­वासन देत नसल्याने आपल्या उसाला तोड कधी मिळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाला आता तुरे फुटण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Advertisement

उसाला तोड यावी, यासाठी सध्या धडपड सुरू आहे. नोंदणी केलेल्या उसाला ऊसतोड द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. ऊसतोडीतही राजकारण शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे

Advertisement

ऊसतोडी टोळी मिळविण्यासाठी मन:स्ताप सहन करावा लागत असून, काही वेळा पैसेही मोजावे लागत आहेत. दरम्यान लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्­न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement