मास्टर शेफ पूरग्रस्तांना दररोज देताहेत १५ हजार थाळी जेवण

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- मास्टरशेफ संजीव कंपूर शेफ हे जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवठा करत आहेत. त्यांची टीम पूरग्रस्तांना दररोज एकूण १५ हजार थाळी ताजे जेवण पुरवत आहे.

संसार उभे करण्यासाठी मदतीचा हात :- कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने शेकडो संसार मोडून पडले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटीही त्यात खारीचा वाटा उचलत आहेत.

माणुसकीच्या दिशेने टाकलेले लहानसे पाऊल :- ‘महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांची घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही.

Advertisement

माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबीयांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,’ असं संजीव कपूर यांनी सांगितलं.

कोरोना काळात पुरविले दहा लाख थाळ्या भोजन :- कोरोनाच्या संकट काळातही संजीव कपूर यांनी अशीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत त्यांच्या टीमने दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनऊ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी दहा लाखांहून अधिक थाळी जेवण पुरवले आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker