समस्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अभिमानास्पद अशी बातमी : हवाई दलाच्या प्रमुखपदी महाराष्ट्राचे सुपुत्र ! जाणून घ्या त्यांच्याविषयी…

MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :-  समस्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अभिमानास्पद अशी एक बातमी आहे,कारण आता हवाई दलाच्या प्रमुख पदी महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी विराजमान होणार आहेत.

1 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील नांदेडचे भूमीपुत्र विवेक चौधरी हे नवे एअर चीफ मार्शल होणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. देशाचे नवे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे नांदेडमधील हदगाव तालुका येथील हस्तरा गावचे मूळ राहवाशी आहेत

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी सध्या वायस चीफ ऑफ एअर स्टाफ पदावर आहेत. एअर मार्शल व्ही. आर चौधरी यांना 29 डिसेंबर 1982 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात दाखल करण्यात आले.

Advertisement

ते सध्या वायफ चीफ ऑफ एअर स्टाफ पदावर आहेत आणि त्यांनी विविध स्तरांवर विविध कमांड, स्टाफ जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. परम सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदकासह त्यांच्या सेवेदरम्यान त्यांना विविध पदके आणि सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.

व्हीआर चौधरी 1 ऑगस्ट 2020 पासून वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख होते. 29 डिसेंबर 1982 रोजी त्यांना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात एक लढाऊ पायलट म्हणून समाविष्ट करण्यात आले

आणि त्यांनी सुमारे 39 वर्षे सेवा केली. व्ही.आर. चौधरी यांच्याकडे 3800 तासापेक्षा अधिक विविध प्रकारचे लढाऊ आणि प्रशिक्षक विमान उडवण्याचा अनुभव आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker