Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

पायाला तारांचा फास लागून बिबट्याचा मृत्यू !

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:राहुरी तालुक्यातील गोटुंबा आखाडा परिसरात बाबासाहेब सखाराम शेटे यांच्या उसाच्या शेतात लोक वस्तीपासून सुमारे २०० फुटाच्या अंतरावर दीड वर्षे वयाच्या नर बिबट्याचा डाव्या पायाला जाड तारांचा फास लागून मुत्यु झाल्याची घटना घडली आहे.

Advertisement

ऊसतोड सुरू असताना दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी ऊसतोड कामगारांच्या ही बाब लक्षात आली. १ एप्रिल २०२० ते १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून ३०८ पाळीव प्राण्यांची शिकार झाली आहे.

Advertisement

शासनाकडून दोन दोन वर्षे मोबदला मिळत नाही. अशा वेळी शेतकरी राणडुकरे व इतर जंगली प्राण्यांपासुन पिकाचे नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी शेतीच्या बांधाला बाईंडींग ताराचे फासे व सरळ तारा बांधतात.

Advertisement

त्यामुळे त्यात वन्य प्राणी अटकतात. शेत शेतकऱ्यांच्या घरापासुन लांब असल्यामुळे त्याकडे कुणाचे वेळीच लक्ष जात नाही. अशा वेळी बिबट्यासारख्या जंगली प्राण्यांचे जीव जातात.

Advertisement

काल असाच प्रकार घडला असल्याचे गोटुंबा आखाड्यावरील लोकांनी वनविभागाला कळविले त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वनमंडळ आधिकारी परदेशी, वनपाल निकम व वनरक्षक मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्यास ताब्यात घेऊन पंचनामा केला.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement