Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

अहमदनगर जिल्ह्यात इन्कमटॅक्सच्या धाडी : 335 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले !

Mhlive24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या संगमनेर येथील एका उद्योगसमुहाशी संबंधीत राज्यातील तब्बल 34 ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत 335 कोटी रूपयांचे बेहिशेबी व्यवहार आढळून आले आहेत.

Advertisement

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी संगमनेर आणि पुण्यातील एका कंपनीच्या, महाराष्ट्रातील 34 ठिकाणच्या विविध कार्यालयांवर शोध मोहीम आणि जप्तीची कारवाई केली.

Advertisement

या कंपन्या, तंबाखू आणि त्याच्याशी संबधित उत्पादनांची निर्मिती, पॅकेजिंग आणि विक्री तसेच ऊर्जावितरण, एफएमसीजी आणि बांधकाम व्यवसायांशी संबधित आहेत. या शोध मोहिमेत, हस्तलिखित आणि कॉम्युटर वरील एक्सेल शीट्स मध्ये असलेल्या हिशेबांमध्ये 243 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख तंबाखू विक्री केल्याची माहिती आढळली.

Advertisement

त्याशिवाय, काही तंबाखू उत्पादनांशी संबधित व्यवहारांची चौकशी करतांना, आणखी सुमारे 40 कोटी उत्पादनांची बेहिशेबी विक्री केल्याचेही आढळले. हे व्यावसायिक, बांधकाम व्यवसायाशी संबंधित व्यवहारांमध्ये नोंदणीकृत किमतीपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारत आणि देत असल्याचेही लक्षात आले आहे.

Advertisement

यासंदर्भात 18 कोटी रुपयांचे रोखीचे व्यवहार झाल्याचे पुरावे आढळले आहेत. प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 50C चे उल्लंघन केल्याप्रकरणी, 23 कोटी रुपयेही आढळले आहेत. या शोध मोहिमेदरम्यान बांधकाम खरेदी विक्रीच्या बेहिशेबी व्यवहारांमध्ये 9 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे या व्यावसायिकाने (करदात्याने) मान्य केले.

Advertisement

एक कोटी रुपये इतकी बेहिशेबी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत, 335 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आढळले आहे. याप्रकरणी पुढचा तपास सुरु आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement